चाहुर येथे कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : चाहुर येथे कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या हायवेवर शु पॅलेस दुकानाच्या समोर अज्ञात इसम दि ८ रोजी पहाटे ५ वाजता पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.धडकेनंतर वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. पहाटेची वेळ असल्याने त्या इसमाच्या अंगावरून काही वाहने गेल्याने शरीराचे अवयव छिन्नविच्छिन्न झाल्याने मृताची ओळख पटवता आली नाही, याप्रकरणी पोलीस हवालदार सुजित भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोरखळ येथे घरात गुलाल टाकल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या