05:00pm | Jan 09, 2025 |
बारामती : कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक शेती शक्य आहे, ही बाब बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीने सिद्ध करून दाखविली आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी बुधवारी (ता. ८) दिल्ली येथे या प्रकल्पाची दखल घेत, ‘भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल,’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्य नाडेला तीन दिवसांच्या भारतभेटीवर असून, त्यांनी दिल्ली येथे बुधवारी मायक्रोसॉफ्ट व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सुरु असलेल्या फार्म ऑफ द फ्युचर या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.
बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी उसाची शेती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक प्लॉटस विकसित करण्यात आले आहेत.
एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षपणे हे काम सुरु असून, त्या संशोधनाचे निष्कर्ष, त्याचे चित्रीकरण, माहिती संकलन याची माहिती नाडेला यांनी समक्ष पाहिली.
पुरुष व महिला शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक तत्त्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कशा पद्धतीने उसाचे एकरी उत्पादन कमी खर्चात वाढविण्याचा प्रयोग सुरु आहे, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सॅटेलाईट, ॲपचा वापर कसा केला जातो, याची पाहणी यातील सदस्यांनी केली. ग्रामीण भागातील शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत, याबद्दल नाडेला यांनी आनंद व्यक्त केला.
हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या महिला शेतकरी सीमा चव्हाण यांच्याशी सत्य नाडेला यांनी संवाद साधत ॲपवरून कशा पद्धतीने नियंत्रण केले जाते, याची माहिती घेतली. यावेळी प्रकल्प समन्वयक तुषार जाधव हेही उपस्थित होते.
ऊसशेतीपाठोपाठ आता फळबागांच्या संवर्धनामध्येही कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर सुरु करण्यात आला आहे. बारामतीतील कृषिक प्रदर्शनात त्याचे प्लॉट शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. हा प्रयोगही यशस्वी ठरत आहे. त्यामुळे कृषी अर्थकारणाला गती मिळणार असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही कमी क्षेत्रात अत्यल्प खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य होईल. बेभरवशाची असणारी शेती या तंत्रज्ञानाचे भरवशाची बनेल, असा विश्वास ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्तांना वाटत आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यापासून संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दूरदृष्टी, संस्थेचे विश्वस्त व ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘ऑक्सफर्ड’चे संचालक डॉ. अजित जावकर यांचे प्रयत्न, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व सहकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे राबविलेल्या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे. प्रतापराव पवार यांनी याबाबत सर्वच पातळ्यांवर पुढाकार घेत समन्वय साधल्याने कमी वेळेत हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला.
बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सदस्यांना भेटून आनंद झाला. कृषी क्षेत्रात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत ‘एआय’च्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी उसाची शेती विकसित करण्याचा प्रयोग बारामतीत प्रत्यक्षात आला आहे. देशभरात छोट्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग प्रभावीपणे राबविल्यास त्याने कृषी अर्थकारणाला गती मिळेल. - सत्य नडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |