सातारा शहरात मध्यवर्ती भागातशाहूनगर येथे वेश्या व्यवसाय ; १ महिला आणि १ पुरुष ताब्यात; चालक फरार

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती भागातील शाहूनगर येथे एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून एक वेश्या व्यवसाय करणारी महिला आणि दलाल असलेला मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी बनावट पंटर पाठवून सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले आहे. 

शहरात अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याने मोठी खळबळ उडाली असून आणखी मोठे मासे गळाला लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर परिसरात साई मंगल अपार्टमेंट,अजिंक्यतारा रोड येथे शुक्रवारी दुपारी सातारा शहर पोलीस आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाने(ए.एच. टी.यु) मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा टाकला.यामध्ये वेश्या व्यवसाय करणारी महिला आणि एक दलाल पुरुषाला पोलिसांनी घेतले ताब्यात,संतोष पवार असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

संतोष पवार हा मॅनेजर असून साताऱ्यातील आंबट शौकीनांना महिला पुरवण्याचे काम करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.छाप्यादरम्यान वेश्या  व्यवसाय चालक गणेश धनावडे हा फरार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेढ्यात फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश; फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक, २१ पर्यंत पोलीस कोठडी
पुढील बातमी
जकातवाडीत जनावरांची अवैध वाहतुकीप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या