३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर

​उपराकार लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषदेत माहिती

by Team Satara Today | published on : 22 April 2026


सातारा : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा ३४ वा 'फुले-आ आंबेडकर साहित्य पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

​यावेळी भटके विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव, खजिनदार हरिदास जाधव व रामभाऊ जाधव उपस्थित होते. परुळेकर यांच्यासोबतच संस्थेचे इतर महत्त्वपूर्ण पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये विशेष जीवनगौरव पुरस्कार पारधी समाजाचे नेते गणेश काळे (कोल्हापूर) यांना, तर जीवनगौरव पुरस्कार भटके विमुक्त जमाती संघटनेचे नेते डॉ. शिवलाल जाधव (मुंढवा, पुणे) यांना घोषित झाला आहे. तसेच प्रा. डॉ. प्रकाश जाधव (निलंगा, लातूर) यांना 'यलाप्पा वैदू युवा साहित्य पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे.

​संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते येत्या ९ मे रोजी जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेत दुपारी १ वाजता या सर्व पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गौणखनिज व्यवस्थापनात प्रशासनाची दमदार कामगिरी ; महसूल विभाग १०० कोटी लक्ष्याच्या उंबरठ्यावर
पुढील बातमी
साताऱ्यात सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप

संबंधित बातम्या