जीवन आनंददायी असावे : जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे

by Team Satara Today | published on : 27 January 2025


सातारा : अनुभव फिल्म क्लबच्यावतीने येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ झाला. त्याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व निर्माते डॉ. मोहन आगाशे यांचा कलाकारांशी सुसंवाद झाला. तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानिका देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये  बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिरीष चिटणीस होते.

डॉ.मोहन आगाशे म्हणाले, "चित्रपट हे हसत,खेळत व चिमटे काढणारे असावेत. मानवाने जीवनही कोणताही ताण-तणाव न घेता आनंददायी जगले पाहिजे. आपल्या कलेचा आविष्कार समाजासाठी असला पाहिजे. चित्रपट कलेचे माध्यम आहे. मात्र,त्यासाठी संवाद झाला पाहिजे. नजरेची व आवाजाची भाषा ही समजूतदार असावी. शब्दांची भाषा ही बुद्धीची असते. कोणत्याही प्रकारची चळवळ सुरू होत नाही. अभिनेत्री शर्मिला टागोर आजची नाही. तर ती होऊन गेलेली आहे." पुणे शहरात एकाआड निवासस्थानात ज्येष्ट मंडळी आढळून येत आहेत. तिथे सर्व सुविधा मिळत असल्याचाही दाखला देत पुणेकर असल्याचही डॉ.आगाशे यांनी सांगितले.

सुंदर चित्रपटांची मेजवानी या २०२५ च्या स्वागतात सातारकर चित्रपट रसिकांसाठी 'अनुभव फिल्म क्लब'द्वारे करण्यात आली होती. सचिव राजभूषण सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी खजिनदार मकरंद जोशी, उपाध्यक्ष ऍड.गिरीश कुलकर्णी, सहसचिव डॉ.सारिका देशपांडे, सौ.शिल्पाताई चिटणीस, कार्यकारीणी सदस्य,विविध क्षेत्रातील मान्यवर,कलाकार व सिनेरसिक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. 

मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे काम दृकश्राव्य म्हणजेच चित्रपट माध्यमाद्वारे गत २७ वर्षे सातत्याने करणारी चित्रपट रसिकांची कलात्मक चळवळ म्हणजे 'अनुभव फिल्म क्लब' होय. वर्षभर जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम विदेशी चित्रपट दाखवतानाच मराठी चित्रपट सृष्टीतील काही नजरेतून सुटलेले वेगळेपण जपणारे चित्रपटांना रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच दिग्दर्शक कलावंतांचा रसिकांशी भेट घडवून आणण्यासाठी 'माय मराठी महोत्सव 'सेव्हन स्टार चित्रपटगृह, सातारा' येथे संपन्न झाला. झाला आहे. तेव्हा चित्रपट रसिकांनी या पर्वणीचा लाभ घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न
पुढील बातमी
निंभोरे गावात आढळला मृतावस्थेत बिबट्या

संबंधित बातम्या