मुलाच्या वियोगाने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने केले विषारी औषध प्राशन; दोघांचाही मृत्यू

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा : मुलाच्या वियोगाने दाम्पत्याने विषारी औषध प्राशन केले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्रीच्या सुमारास सविता विनायक गंगावणे व त्यांचे पती विनायक (रा. काळोशी, ता. सातारा) यांनी त्यांचा मुलगा ओमकार हा आठ ते नऊ वर्षांपूर्वी मयत झाल्याच्या नैराश्यातून व मानसिक ताण तणावाखाली विषारी औषध प्राशन केले. 

त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सातारा तालुका पोलीस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोळाचा ओढा ते रामनगर रस्त्यावर कारने धडक दिल्याने तीनजण गंभीर जखमी; कार चालकाविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देतेय चरणसेवा ; मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

संबंधित बातम्या