सातारा : सातारा शहर परिसरात घरफोड्या करणार्या पुणे येथील चोरट्याला अटक केली असता त्याच्याकडून 5 लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आल आहे. निलेश अंकुश काळे (वय 57, रा. देहूरोड, पुणे) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.
निलेश काळे हा सराईत गुन्हेगार आहे. तो दिनांक 15 ऑक्टोबर रोजी हा शिरवळ परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला (एलसीबी) मिळाली. त्यानुसार एलसीबी पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेअनेक ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. घरफोड्यांची दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी व सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी चोरीतील मुद्देमालाची विचारणा केली असता चोरट्याने साडेपाच तोळे सोने, एक चांदीचा छल्ला व एक पल्सर मोटार सायकल असा सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांना दिला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, रूपाली मोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अमोल माने, अजय जाधव, हसन तडवी, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.