सातारा : ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी साताऱ्यातील एका सेवानिवृत्त अभियंत्याची तब्बल ६९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्रवीण प्रभाकर शेळके (रा. प्रतापगंज पेठ) यांना व्हॉट्सॲपद्वारे लिंक पाठवून 'D83-Tranquility Foundation' या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर 'UP QIB PRO' या ॲपवर ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त करून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी ६९.४५ लाखांची रक्कम भरून घेण्यात आली. परतावा न मिळाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे तपास करत आहेत.