रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.  १ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या पूर्वी शिवथर, ता. सातारा येथील रेल्वे स्थानकाच्या येथे संजय तानाजी सावंत (रा. नागेवाडी, ता. सातारा) यांना रेल्वेची धडक बसली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता
पुढील बातमी
जुन्या वादातून एकास कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या