कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना भागातील वाघणे येथे शेतात गेलेल्या आनंद हरी बल्लाळ (वय ५०) यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बल्लाळ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आनंद बल्लाळ हे दुपारी तीनच्या सुमारास वाघणे येथील शेतात गेले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना पाटण येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
कोयना भागातील वाघणे येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 22 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा