08:42pm | Nov 29, 2024 |
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्रात आणि बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. यानंतर ऑनलाईन अर्जामधील माहितीच्या आधारावर पात्र उमेदवारांची यादी दिनांक १८-०९-२०२४ रोजी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ ते सोमवार दिनांक ९ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सातारा व पुणे या शहरांमधील खालील ठिकाणी घेतली जाणार आहे.
१. यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा, एनएच-४, सर्वे नं. २४२/१, व्हीएन आरडी., वाढे, सातारा, महाराष्ट्र ४१५०१५.
२. नोवा कन्सलटन्सी सर्विसेस, पुणे-सातारा रोड, ललवाणी मदर अॅंड चाईल्ड केअर हॉस्पिटल समोर, वसंत बाग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.
३. ट्रिनीटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड रिसर्च, सासवड-बोपदेव-पुणे रोड, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, पुणे-४११०४८
४. एमआयटी आर्ट, डिझाईन अॅंड टेक्नोलॉजी युनिवर्सिटी, राजबाग लोणी काळभोर, सोलापूर हायवे, भारत पेट्रोल पंपाजवळ, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन, पुणे - ४१२२०१
५. जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड मॅनेजमेंट, नविन गेट नंबर १२००, डोमखेल रोड, वाघोली, पुणे - ४१२२०७
कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांसाठी वर नमूद तारखांना सकाळी १०.०० ते ११.३०, दुपारी १.०० ते २.३० व दुपारी ४.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी www.sataradccb.in व www.sataradccb.com या संकेतस्थळावर शनिवार दिनांक ३०-११-२०२४ पासून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध केले जाणार आहे. बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या पात्र उमेदवारांच्या यादीमधील उमेदवारांनी वर नमूद संकेतस्थळावरून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून घ्यावे.
उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेस येताना फक्त ओरिजिनल प्रवेश पत्र (हॉल तिकीट), पेन, ओरिजिनल ओळख पत्र, (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड) बरोबर घेऊन यावे. याशिवाय कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाही. (उदा. कॅलक्युलेटर, स्मार्टवॉच, इलेक्ट्रोनिक घड्याळ, ब्लूटूथ, मोबाईल फोन, पेजर अथवा अन्य साहित्य व इतर कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे). महिलांच्या नावात बदल असलेस विवाह नोंदणी प्रमाणपत्र / राजपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेपूर्वी २ तास आधी उपस्थित राहणेचे आहे. परीक्षा सुरु झालेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील (हॉल तिकीट) सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांशिवाय इतर कोणालाही परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
तरी, वरील सर्व सूचनांची नोंद उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन बँकेमार्फत करणेत आले आहे.राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |