सोनाली माणिक मुळीक यांची कार्यकारी सहाय्यक पदी निवड

by Team Satara Today | published on : 10 April 2025


फलटण : सासकल गावची सुकन्या, प्रगतिशील शेतकरी श्री माणिक तुकाराम मुळीक व संगिता माणिक मुळीक यांची कन्या व माजी सरपंच मछिंद्र तुकाराम मुळीक व शांता मच्छिंद्र मुळीक यांची पुतणी तसेच बबई तुकाराम मुळीक व तुकाराम केशव मुळीक यांची नात कु.सोनाली माणिक मुळीक यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 साली 'कार्यकारी सहाय्यक' पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 10 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.तिची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली आहे.  

कु.सोनाली माणिक मुळीक हीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून शेतीतली कामे करून, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत तिने हे यश प्राप्त केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ.शाळा निरगुडी व माध्यमिक शिक्षण निरगुडी हायस्कूल निरगुडी येथे झाले आहे. तिने पदवीपर्यंतचे शिक्षण वाणिज्य शाखेत मुधोजी महाविद्यालय मधून पूर्ण केले आहे.कु.सोनाली माणिक मुळीक हिने पदवीनंतर सनदी लेखापाल यांच्या हाताखाली दोन वर्षे कामही केले आहे. कु.सोनाली माणिक मुळीक यांना तीन बहिणी असून मोठी बहीण माधुरी हीने अभियांत्रिकी क्षेत्रात, मनीषा हिने संगणक क्षेत्रात तर लहान बहीण कला शाखेत अध्यापन करत आहे.

या यशाबद्दल तिचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, गावचे सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच सोनाली मदने, सदानंद मुळीक, किरण घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक,राजेंद्र धोंडिबा घोरपडे, चांगुणाबाई  सर्जेराव मुळीक, मोहन नामदेव मुळीक, लता विकास मुळीक, धनाजी सदाशिव मुळीक, मोहन गोपाळ मुळीक, संजय मुळीक, दीपक विष्णुपंत मुळीक, एडवोकेट रामचंद्र घोरपडे, विनायक संभाजी मुळीक,शिवाजी शंकर मुळीक, जालिंदर महादेव मुळीक, दत्तात्रय नामदेव मुळीक, दत्तात्रय महादेव चव्हाण, चंद्रकांत महादेव चव्हाण, विकास लक्ष्मण मुळीक, मनोहर संभाजी मुळीक, लालासो शंकर सावंत, लहू राजे सावंत, मोहन रामचंद्र मुळीक,सोपान रामचंद्र मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक,  दत्तात्रय धोंडीबा मुळीक, विनायक नारायण मदने, शिवाजी हरिबा मुळीक व ग्रामस्थ यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
पुढील बातमी
कृष्णा कालव्यातील पाणी सोडल्याने चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

संबंधित बातम्या