सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र दीपक सुर्वे (रा. कोडोली, सातारा) याला सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेले असताना तो दि. 14 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावरील बालाजी ढाबा येथील रस्त्यावर आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार महांगडे करीत आहेत.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोडोलीतील एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा