आषाढी वारीतील सेवेकरांसाठी रंगला कृतज्ञता सोहळा

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते याशनी नागराजन यांचा सत्कार

by Team Satara Today | published on : 31 July 2025


सातारा : पंढरपूर येथे आषाढी यात्रा कृतज्ञता मेळावा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, सरपंच व कर्मचारी उपस्थित होते. या कृतज्ञता मेळाव्यात आषाढी वारीदरम्यान विशेष काम करणारे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सातारा जिल्ह्यात वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सन्मान करण्यात आला.

वारकरी यांच्या सेवेसाठी झटलेले कर्मचारी, पदाधिकारी व अधिकारी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरी नगरीत २ कोटींपेक्षा अधिक भाविकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, असे मत मंत्री गोरे यांनी व्यक्त केले.

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील शहरे, ग्रामपंचायती व पंढरपूर शहरातील वारकरी यांचे सेवाकार्य केले बद्दल कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आषाढी यात्रा यशस्वी केल्याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपायुक्त विकास मंजिरी कुलकर्णी, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदींचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे पंचायत अधिकारी, सरंपच, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, पाणी व स्वच्छतेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले, बांधकामचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, जिल्हा तज्ज्ञ राजेश इंगळे, गटविकास अधिकारी खटाव योगेश कदम, फलटणचे गटविकास अधिकारी सतिश कुंभार, खंडाळा सहायक गटविकास अधिकारी प्रकाश बोबले, पालखी मार्गावरील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व पंचायत समितीचे विस्तार अधिकरी, बीआरसी, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


वारकऱ्यांची सेवा हेच माझे समाधान!
निर्मल वारी यशस्वी केली. महास्वच्छता अभियानात स्वच्छतेचा संदेश दिला. त्यासाठी सर्व कर्मचारी, व्यापारी, पदाधिकारी व अधिकारी व कर्मचारी राबले. पालखी सोहळयाचे विश्वस्त खुश झाले. सोहळयातील वारकऱ्यांना मुख्यमंत्री वारकरी निवारा व्यवस्था दिली. पालखी सोहळाप्रमुखांना देखील जर्मन हॅंगर सुविधा या पुढे पुरविणेत येणार आहे. व्हीआयपी दर्शन बंद होऊन पाच तासावर दर्शन बारी आली. या व्यवस्थेमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझी सेवा असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगून भावविवश होऊन सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जागृतीचा विस्तव तेवत ठेवायला हवा : अरुण जावळे
पुढील बातमी
अवैध गोशाळा व गोरक्षकांवर कारवाई करावी

संबंधित बातम्या