सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हेमंत जयंतीलाल तपासे रा. शनिवार पेठ, सातारा यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सचिन हिंदुराव तपासे रा. मल्हार पेठ, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक माने करीत आहेत.