शाहूपुरी पोलिसांकडून आठ लाख 80 हजार चा मुद्देमाल मूळ मालकाला परत

by Team Satara Today | published on : 13 August 2024


सातारा : शाहूपुरी पोलिसांनी घरफोडी मध्ये चोरी झालेले 15 तोळे वजनाचे दागिने आणि 96 हजार रुपये रोख असा आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मूळ मालकास परत मिळवून दिला आहे. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
दि. 26 मे 2019 रोजी राजकुमार रामचंद्र उधानी रा. लोखंडे कॉलनी, शुक्रवार पेठ यांच्या घरी झाली होती. या घरफोडीत 15 तोळे वजनाचे दागिने ९६ हजार रुपये रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली. अवघ्या 24 तासाच्या आत घरफोडीतील आरोपीला अटक करून त्याच्याकडून 15 तोळे वजनाचे दागिने आणि 96 हजार रुपये रोख असा आठ लाख 80 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मंगळवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते मूळ मालकाला परत देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल व उपाधीक्षक राजीव नवले उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली; सुधाकर पठारे सातारचे नूतन पोलीस अधीक्षक
पुढील बातमी
ग्रेड सेपरेटर मधील मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या