ब्रिटन : ब्रिटीश लेखिका समंथा हार्वे यांच्या अंतराळ स्थानकावरील 'ऑर्बिटल' (Orbital) या पुस्तकाला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. पृथ्वीचे सौंदर्य आणि नाजूक आश्चर्यकारक कल्पनांवरील कथांचा या पुस्तकांत समावेश आहे. 'ऑर्बिटल ही कादंबरी स्पेसवर आधारित असणारे आणि पुरस्कार जिंकणारे पहिले पुस्तक असल्याचे वृत्त 'CNN' वृत्तवाहिनीने दिले आहे.
बुकर पुरस्कार मिळालेले 'ऑर्बिटल' हे जगाचा वेगळ्या दृष्टीकोनतून विचार करते. कारण ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांच्या संघाचे नेतृत्व करते. हे ब्रिटनमध्ये (UK) सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे. या पुस्तकाने मागील तीन बुकर विजेत्यांना देखील मागे टाकले आहे. २०१९ नंतर समंथा हार्वे या बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत. लंडनमधील ओल्ड बिलिंग्जगेट येथे एका समारंभात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पन्नास हजार पौंड ( £50,000) इतकी रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात आली आहे.
बुकर पारितोषिकाची स्थापना 1969 मध्ये झाली आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी आयरिश लेखक पॉल लिंच यांना हा पुरस्कार मिळाला होता.