साताऱ्यात राजलक्ष्मी थिएटर परिसरातील कॅफेवर पोलिसांचा छापा; चालकावर 'पॉक्सो' अन्वये गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : शहरातील राजलक्ष्मी थिएटर परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 'सीजन कॅफे'वर छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी कॅफे चालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवी चौक येथील विमल एम्पायर इमारतीमध्ये 'सीजन कॅफे-द फूड कोर्ट' कार्यरत आहे. या कॅफेमध्ये काही अल्पवयीन मुले अश्लील कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी कॅफेमध्ये कापडी पडदे लावून स्वतंत्र रूम्स तयार करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले.

कॅफे चालक मंथन मोहन पवार (वय २६, रा. मंगळवार पेठ, सातारा) हा अल्पवयीन मुला-मुलींकडून पैसे घेऊन त्यांना या रूम्स उपलब्ध करून देत होता. या ठिकाणी अश्लील कृत्यांसाठी अपप्रेरणा दिली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२६ नुसार पॉक्सो ॲक्ट कलम १२ आणि १७ अन्वये चालक मंथन पवार याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 






लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
पुढील बातमी
जमीन विक्रीचे आमिष दाखवून कोरेगावातील एकाची १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक; दोन आरोपींना अटक

संबंधित बातम्या