उधारीच्या पैशांवरून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 August 2026


सातारा : उधारीवर घेतलेल्या सफरचंदांचे पैसे मागितल्याच्या कारणावरून फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास राधिका रोडवरील शेतकरी भाजी मंडईजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्षद राजू बागवान (वय 32, रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तक्रारदार आणि संशयित एकमेकांच्या परिचयाचे आहेत. संशयित सनी धनराज भिसे याने यापूर्वी तक्रारदाराकडून उधारीवर सफरचंद घेतले होते. मात्र, त्याचे पैसे दिले नसल्याने तक्रारदार यांनी आपल्या मोबाईलवरून भिसे याला फोन करून, यापूर्वी घेतलेल्या सफरचंदांचे पैसे कधी देतोस? अशी विचारणा केली.

याचा राग आल्याने सनी भिसे तसेच त्याचे मित्र मयूर अरुण गवळी आणि अभि (पूर्ण नाव माहीत नाही) रा.आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील याने संगनमत करून तक्रारदाराला फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली. आम्ही पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, तुला कोणाला काय सांगायचे ते सांग, असे म्हणत धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सनी धनराज भिसे (रा. बुधवार नाका, सातारा), मयूर अरुण गवळी (रा. शाहूनगर, सातारा) आणि पूर्ण नाव माहीत नसलेला संशयित अभि (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अतीत येथील घरफोडीत दागिन्यासह रोकड लंपास; बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
जरंडेश्‍वर नाका परिसरात भरधाव दुचाकीस्वाराची तरुणाला जोराची धडक; अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या