सातारा : लिंब येथील गौरीशंकर कॉलेजजवळ कोलदरा शिवारातील औद्योगिक डीपी फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० किलो तांब्याची तार चोरून नेली. या घटनेमुळे संबंधित कंपनीच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलदरा शिवारातील इंडस्ट्रियल डीटीसी क्रमांक ०९३१५७४, ६३ केव्हीए क्षमतेच्या रेवा एन्टरप्रायजेस कंपनीच्या डीपीमध्ये ही तार होती. दि. ३ जुलै रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली.
याप्रकरणी सचिन सुभाष वाघमोडे (वय ४७, रा. आरळे, ता. जि. सातारा, सध्या रा. काटे कॉलनी, कोडोली, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार कुमठेकर अधिक तपास करीत आहेत.
लिंब येथील औद्योगिक डीपी फोडून ६० किलो तांब्याची तार लंपास; अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 09 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा