साताऱ्यातील संभाजीनगर परिसरातील फायनान्स कंपनीच्या जागेत घुसखोरी

by Team Satara Today | published on : 23 March 2026


सातारा  : साताऱ्यातील संभाजीनगर परिसरातील सोमनाथ हौसिंग सोसायटीत फायनान्स कंपनीच्या ताब्यात असलेल्या जागेत अनधिकृत प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोमनाथ बबनराव जगताप, नंदा सोमनाथ जगताप आणि शुभम सोमनाथ जगताप यांनी संबंधित जागेत प्रवेश केला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस नाईक अवघडे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील पवळेश्वरनगर येथून युवती बेपत्ता

संबंधित बातम्या