साताऱ्यात २२ वर्षांनंतर होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत; डॉ. बाबुराव गुरव व कॉ. धनाजी गुरव यांची घोषणा

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा : सातारा येथे येत्या दि, ३ व ४ मे रोजी होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक शाहीर आणि विद्रोही शाहिरी जलस्याचे प्रवर्तक  तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून संबंधित असलेले शाहीर संभाजी भगत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे,अशी माहिती पुणे येथे झालेल्या राहुरी येथे झालेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ बाबुराव गुरव व विद्रोही सांस्कृतिक  चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

यावेळी पत्रकार परिषदेला  एड. सुभाष पाटील, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व सहस्वागताध्यक्ष हभप डॉ. सुहास महाराज फडतरे , कार्याध्यक्ष कॉ. विजय मांडके, सरचिटणीस एड. राजेंद्र गलांडे,  प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन साताऱ्यात घेतले जात आहे.

शाहीर संभाजी भगत हे मुळचे सातारा जिल्ह्यातील पांचगणी जवळील महू गावचे.‌ संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या कोर्ट या चित्रपटातील एक गाणे त्यांनी गायले आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली या नाटकाची मूळ संकल्पना नाटकातील गीते व संगीत संभाजी भगत या नाटकाला त्यानंतर शिवाजी अंडरग्राउंड ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्य महोत्सवासाठी निवड झाली. संभाजी भगत यांनी 5 व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आणि पहिल्या लोक सांस्कृतिक  साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. सरपंच भगिरथ आणि नागरिक या चित्रपटाना संभाजी भगत यांनी संगीत दिले. तर, फनरल आणि तुझ्या आईला या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.संभाजी भगत यांना अस्मितादर्श पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, प्रबोधन मित्र पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार मिळालाय.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र आणि विद्रोही संमेलन संयोजन समिती, सातारा यांच्यावतीनं लवकरच १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाईल, अशी माहिती  विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि  डॉ. सुहास महाराज फडतरे  यांनी  दिली. 

साताऱ्यात  २२ वर्षांनंतर विद्रोही साहित्य संमेलन 

सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ.बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.असे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मडके यांनी सांगितले .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खैर वृक्षाच्या तोडप्रकरणी फडतरवाडीचे तिघे वनविभागाच्या ताब्यात; न्यायालयाकडून एक दिवसाची वन कोठडी
पुढील बातमी
सातारा पालिकेची 11 रोजी विशेष सभा; विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी मोर्चेबांधणी

संबंधित बातम्या