सातारा : अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी मोलकरणीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरकाम करणार्या महिलेने अडीच लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला असल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सोन्याचा गंठण, सोन्याचे तोडे, सोन्याच्या रिंगा, सोन्याची चैन असा मुद्देमाल आहे. पोलीस तपास करत आहेत.