अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले?; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बिघाड की आणखी काही चर्चांना उधाण

by Team Satara Today | published on : 28 January 2026


बारामती  : अजित पवार यांच्या विमान अपघाताचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये दिसणारी दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत. हे विमान धावपट्टीच्या दिशेने सरळ रेषेत येत असताना, लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद आधी अचानक डाव्या बाजूला झुकले आणि जमिनीवर आदळले. या 'सडन टिल्ट'मुळे हा घातपात की तांत्रिक बिघाड, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात रूपांतर झाले.

'विमानात बिघाड नव्हता': विमान ज्या कंपनीचे होते VSR Aviation, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी स्पष्ट केले आहे की, विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमानाची देखभाल वेळोवेळी केली गेली होती आणि वैमानिकही अनुभवी होते. त्यांच्या मते, कमी दृश्यमानता हेच अपघाताचे प्रमुख कारण असू शकते.

तांत्रिक शक्यता काय? तज्ज्ञांच्या मते, विमान 'वाकडे' होण्यामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात:

विंड शियर : लँडिंगच्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक बदलल्याने विमान एका बाजूला फेकले जाऊ शकते.

इंजिनमधील बिघाड: शेवटच्या क्षणी एका इंजिनने काम करणे थांबवल्यास विमान 'असिमेट्रिक थ्रस्ट'मुळे एका बाजूला झुकू शकते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीच्या मागणी; हा अपघात, यामध्ये राजकारण करु नका- शरद पवार यांना अश्रू अनावर
पुढील बातमी
राजकारणापलीकडची मैत्री हरपली, घटना मनाला धक्का देणारी : पालकमंत्री शंभूराज देसाई यांची अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

संबंधित बातम्या