सातारा : गर्दी मारामारी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खोकडवाडी, ता. सातारा येथे येथीलच विशाल हरिदास सावंत यांना जुन्या वादाच्या कारणातून तेथीलच संतोष सावंत, श्रीकांत सावंत, अनिल काजळे, भानुदास सावंत, विलास सावंत, दत्तात्रय एकनाथ सावंत, गोरख सावंत, राजेंद्र एकनाथ सावंत, विनायक सर्जेराव सावंत, प्रशांत श्रीकांत सावंत, शंकर नरहरी सावंत यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
दरम्यान संतोष भानुदास सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत आदित्य सावंत, विजय सावंत, हरिदास सावंत, विशाल सावंत, वैभव सावंत, ओम सावंत, प्रज्वल सावंत यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.