जिल्हा न्यायालयात जागतिक वृक्षारोपनाने पर्यावरण दिन साजरा

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा  : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा श्रीमती. सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व बालन्यायमंडळ, सातारा तसेच जिल्हा वकील संघ, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि. 5 जून रोजी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.  

यावेळी  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुरेखा कोसमकर, जिल्हा न्यायाधीश-१ एस.आर. तांबोळी, , दिवाणी न्यायाधीश व. स्तर व्ही. पी. पाटील,  , ४ थे सह. दिवाणी न्यायाधीश व. स्तर, आर. आर. मावतवाल व  प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा तथा ६ वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, सातारा जी. बी. नंदागवळे तसेच   ८ वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, सातारा एम. एम. बावरे, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बालन्यायमंडळ, सातारा व सर्व न्यायिक अधिकारी एच. वाय. कावले, तसेच   महेश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील, सातारा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, विकास पाटील व सर्व विधिज्ञ, तनिष्क वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत विविध प्रकारची फळझाडे लावून वृक्षारोपण, करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
बेईमान ऑफ द महाराष्ट्र पुरस्कार उद्धवजींना द्यावा : आशिष शेलार

संबंधित बातम्या