एकता कॉलनी येथे तारेचे कंपाउंड करण्यास मज्जाव; दोघाजणांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : करंजे येथील एकता कॉलनी येथे राहणारे सचिन रमेश धादमे (वय ४७) हे तारेची कंपाउंड करत असताना ताजुद्दीन शाबुद्दीन आगा व हरून शाबुद्दीन आगा (दोन्ही रा. एकता कॉलनी शाहूपुरी सातारा) यांनी धादमे यांना तू इथं कंपाऊंड करायचं नाही, तू कंपाऊंड केलेस तर तुला सोडणार नाही. तुला दाखवतोच. अशी धमकी देत फिर्यादीला शिवीगाळ केली. याबाबत सचिन धादमे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सिव्हिल परिसरात अज्ञाताकडून २० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरीस
पुढील बातमी
सातारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर पोस्कोचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या