सातारा : धनगरवाडी, ता. सातारा येथील एक युवक राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन अम्रेश बाकले (वय 19, रा. धनगरवाडी, ता. जि. सातारा) हा दि. 14 रोजी दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परत न आल्याने त्याच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.