हेरिटेजवाडी हॉटेलच्या पार्किंगमधील गाडीच्या डॅशबोर्डमधून २ लाखांची रोकड लंपास

by Team Satara Today | published on : 03 February 2026


सातारा : सातारा तालुक्यातील आटाळी येथील हेरिटेजवाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या चारचाकी क्रमांक(एम.एच. १२ जे.यु. ५५४९) च्या डॅशबोर्डच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली २ लाखांची रोख रक्कम तेजश्री संतोष सकटे (रा. ६३ दुर्गापेठ, सातारा) हिने संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद रविराज दत्तात्रेय हादगे (वय ३३, व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट, रा. १४०,रामाचा गोट सातारा) यांनी सातारा तालुका पोलिसांत दि. २ रोजी दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार किरण जगताप करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; एकाच गाडीची ६ वेळा फोडली काच
पुढील बातमी
सातारा तालुका पोलिसांनी देगाव गावच्या हद्दीत दारूच्या बाटल्या केल्या जप्त

संबंधित बातम्या