नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केलाय. नुकत्याच झालेल्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत महत्त्वाची चर्चा केली आहे. पीएम मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाची माहिती ट्विट केलीये. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, आज मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सात विशेष आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि युक्रेनच्या नुकत्याच भेटीतून मिळालेल्या दृष्टीकोनांवर विचार विनिमय केला. पीएम मोदींनी लिहिले की त्यांनी संघर्षावर लवकरच चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासोबत शांतता चर्चेसाठी भारताने पुढे यावे असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी रशिया दौऱ्यावर गेले होते. तेथून आल्यानंतर मोदींनी युक्रेन आणि पोलंडचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑगस्ट रोजी मायदेशी परतले आहेत. युक्रेन भेटीबाबत पीएम मोदी म्हणाले होते की, माझा युक्रेन दौरा ऐतिहासिक होता. भारत-युक्रेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी या महान देशात आलो आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संभाषण फलदायी ठरले. शांतता कायम राहिली पाहिजे यावर भारताचा ठाम विश्वास आहे. ते म्हणाले होते की, मी युक्रेन सरकार आणि लोकांचे आदरातिथ्य केल्याबद्दल आभारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने चर्चा करुन संघर्षावर उपाय काढण्याबाबत नेहमीच भूमिका घेतली आहे. भारताने रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांतील संघर्षामध्ये तटस्थ भूमिका घेतली. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहे. भारताचे पंतप्रधान युक्रेन दौऱ्यातून भारतात परतताच रशियाकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला. यावेळी रशियाने वीज केंद्रांना लक्ष्य केले ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |