सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठ येथील श्रीराम सहवास अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 06 March 2026


सातारा : शहरातील ११४/अ श्रीराम सहवास अपार्टमेंट व्यंकटपुरा पेठ येथील पार्किंग मधून हँडल लॉक करून पार्क केलेली १३ हजार रुपये किमतीची पर्पल रंगाची होंडा कंपनीची स्कूटर मोपेड गाडी ही अज्ञात चोरट्याने दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संमतीशिवाय चोरून नेली आहे.

याप्रकरणी गुलाब अण्णा यादव (वय ७० वर्ष,रा. व्यंकटपुरा पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काटकर करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारारोड येथील २० वर्षीय तरुणी साताऱ्यातून बेपत्ता; तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड २० मार्चला; ११ पंचायत समित्यांतील सभापती-उपसभापती निवड १६ मार्च रोजी

संबंधित बातम्या