कराड : दुगदिवीचे विजर्सन करण्यासाठी कृष्णा नदीपात्रात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण औदाप्पा गंगनमल्ली (वय 25) असे त्याचे नाव आहे.
वाठार (ता. कराड) येथील युवक मालखेड गावच्या हद्दीत मूर्ती विसर्जनासाठी गेल्यानंतर ही घटना घडली. परिसरातील मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहिमेनंतर संबंधिताचा मृतदेह शोधण्यात तालुका पोलिसांना यश आल्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले. लक्ष्मण गंगनमल्ली हे मूळचे कर्नाटकातील इंडी परिसरातील आहेत.