साताऱ्यात गुलमोहर महोत्सवाची मुक्तहस्ते उधळण

विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘गुलमोहर डे’ साजरा

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा : सातारा शहराच्या समाज जीवनाचा गेल्या अडीच दशकापासून अभिनय अंग बनलेल्या ‘गुलमोहर डे’ ची परंपरा महाराष्ट्र दिनी कायम ठेवण्यात आली. येथील सेंट थॉमस चर्च मध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘गुलमोहर डे’ साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले, प्रसिद्ध कलाकार कवी रंगकर्मी चित्रकार यांनी या कार्यक्रमात आपल्या रंगचित्रांच्या माध्यमातून या महोत्सवात भर घातली.

सोहेल सय्यद फलटण, राहुल सुतार इचलकरंजी यांनी निसर्गचित्रांच्या माध्यमातून कलाकारांचे लक्ष वेधले. रखरखत्या उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला लाल, पिवळा, निळसर, जांभळा, गुलमोहर फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवा मिळतो. उन्हाळ्यात ज्यावेळी झाडे कोमेजून जातात त्यावेळी लाल भडक रंगाने रंगलेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेतो हाच विचार या पर्यावरण प्रेमी ‘गुलमोहर डे’ च्या निमित्ताने व्यक्त झाला. सुमारे 35 कलाकारांनी या महोत्सवात भाग घेतला होता. कविता, चारोळ्या, शिल्पकला या माध्यमातून या महोत्सवाला एक वेगळा बहर प्राप्त झाला. शिल्पकार रवी कुंभार यांनी चित्रकला आणि शिल्पकला प्रत्यक्ष बालगोपाळांच्या चित्रकला स्पर्धा झाल्या, तसेच त्याचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

जैवविविधतेचा संदेश जनरल उपक्रम राबवण्यात आले झाडे हेच पशु पक्षांच्या आश्रयस्थान आहे. तसेच झाड आणि मानव यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यात आला. काही युवकांनी गुलमोहराच्या झाडांना पाणी घालून हा दिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे संयोजक कबीर गायकवाड यांनी निसर्ग पर्यावरण आणि मानवी संवेदना यांची अतूट नाते रहावे, याची व्यापक जाणीव आजच्या पिढीमध्ये तयार व्हावी हाच या ‘गुलमोहर डे’ चा उद्देश असल्याचे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्याच्या 1280 मंडलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा ठराव
पुढील बातमी
पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे कडेकोट बंदोबस्तामध्ये उघडले

संबंधित बातम्या