सातारा : सातारा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू कला मंदिर येथे विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये सातारा नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी उस्फूर्तपणे आपली कला सादर केल्याने उपस्थितांनी वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दाद देत प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी लेखापाल हेमंत जाधव, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, बाळासाहेब बाबर, सविता फाळके आदी उपस्थित होते.
सातारा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने याही वर्षी सांस्कृतिक गुणदर्शनाचा कार्यक्रम परंपरेपणे आयोजित केला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी वेळ अपुरा असल्याने हा कार्यक्रम त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर गणेश वंदन सेजल साळुंखे यांनी सादर करून कार्यक्रमास चांगली सुरुवात करून दिली. रविंद्र शेलार यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर सिद्धार्थ मलकापूरे यांनी भक्ती गीत सादर केले, अभियंता अनंत प्रभुणे यांनी तर ज्युली चित्रपटातील दिल क्या करे कब किसी से प्यार हो जाये हे गाणं सादर करून सगळ्यांना तरुणाईत घेऊन गेले. त्यांच्या गाण्यानंतर अभियंता सुधीर चव्हाण यांनी आज उनसे पहली मुलाकात होगी हे गीत सादर झाल्यानंतर टाळ्या शिट्ट्यांची बरसात झाली. संस्कृती स्वामी यांनी ऐरणीच्या देवा तुला, शेखर कांबळे यांनी हवा हवा ए हवा सबको लुटा दे हे गाणे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सोमनाथ पवार यांनी माझ्या दुधात नाही पाणी ही गवळण सादर केली.
रवींद्र शेलार यांनी जीना यहां मरना यहां या गाण्यावर उत्तम सादरीकरण केले. त्यांच्या या गाण्यामुळे विविध गुणदर्शन कार्यक्रम खर्या अर्थाने वेगळ्या उंचीवर नेला. अमृता परिहार, ममता पवार,ज्योती गंगावणे यांनी लावणी सादर केली. प्रियंका खंडझोडे यांनी पुष्पा सामी सामी यावर डान्स सादर केला. त्यास उत्स्फूर्तपणे उपस्थितांनी दाद दिली. सचिन मस्के, राहुल वायदंडे, तुकाराम गायकवाड, महेंद्र साठे यांनी फनी डान्स सादर केला. दिव्यांग कर्मचारी बाबर यांनीही उत्कृष्ट डान्स केला. तसेच माजी लेखापाल हेमंत जाधव यांनी मेश अप सादर केले.
अनिल मोहिते यांनी टूटे हुए खाबो ने, शिवाजी वायदंडे यांनी सुर तेची छेडीता, हेमंत अष्टेकर यांनी दिवानो से ये मत पूछो, अभिषेक आडागळे व रूपाली पवार यांनी मला वेड लागले प्रेमाचे, सुनील भोजने यांनी ए मेरे दिल के चैन, बाबू शेलार यांनी आज मौसम बडा बेईमान है, अशोक वायदंडे यांनी फुलो सा चेहरा तेरा, संतोष खुडे यांनी कोई हसीना जब रुठ जाती है तो, सुधीर फणसे यांनी तुमसे अच्छा कोन है, रामचंद्र गायकवाड यांनी यारी हे इमान मेरा यार मेरी जिंदगी, एकनाथ गवारी यांनी जादू तेरी नजर ही छानपैकी गीते सादर केली.
कार्यक्रमानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
एकंदरीतच या कार्यक्रमाने संपूर्ण पालिकेतील कर्मचारी हर्षोल्हासित झाले. अशा कार्यक्रमातून नवचैतन्य मिळते, अशी प्रतिक्रियाही काही अधिकार्यांनी दिली.
सातारा पालिका कर्मचारी रंगले विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात
वन्स मोअर, टाळ्या अन शिट्ट्यांचा प्रतिसाद
by Team Satara Today | published on : 23 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा