सातारा : कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा, डॉ. एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे आणि आरोग्य विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत शिवशक्ती नगर आकाशवाणी केंद्र, सातारा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून शिबिरात कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी, या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सचिन कांबळे, रमेश धडचिरे, जतीन वाघमारे यांच्यासह सावधान मित्र मंडळ सिद्धार्थ प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.