सातारा : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरभरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १९ ते २८ ऑक्टोबर कालावधीत एसएसबी कोर्स आयोजित करण्यात येत आहे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा