कोरेगाव : विद्युत मोटार आणि केबलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरजाईवाडी, ता. कोरेगाव येथून विद्युत मोटार आणि केबल चोरुन नेली. याप्रकरणी बाजीराव शिदू शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोरजाईवाडी गावच्या हद्दीत देवकराचे शिवार नावाच्या हद्दीत ही चोरी झाली.