महामार्गावरून दुचाकीची चोरी

सातारा : पुणे-कोल्हापूर महामार्गावरून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-कोल्हापूर महामार्गावरील म्हसवे पुलाजवळ पार्क केलेली संग्राम बळीराम बाबर रा. म्हसवे ता. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीएम 5734 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


मागील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या