सातारा : दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत महिंद्रा हॉटेल समोर सर्व्हिस रोडवर दुचाकीवरुन पडल्याने विमल हरी नाईकनवरे (वय 51, रा. शाहूनगर, सातारा) या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना दि. 20 एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी दुचाकी चालक अभय यादव याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.