सातारा : महाबळेश्वर आगार सहाय्यक वाहतूक अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पत्नीला दारू पिऊन पतीने शारीरिक, मानसिक त्रास देत कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतीने दारूच्या नशेत पत्नीला माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत तिला शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली, याप्रकरणी पती अमीर लालासो जाधव,सासू साधना लालासो जाधव, सासरे लालासो राजेंद्र जाधव, दीर शैलेश लालासो जाधव (सर्व राहणार पो.विखळे ता.जि कोरेगाव) आणि नणंद निशा शशिकांत चव्हाण (रा. बावधन) यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करत आहेत