ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी नंदकुमार काटे यांची नियुक्ती

नियुक्तीबद्दल जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

by Team Satara Today | published on : 10 September 2025


सातारा, दि. १० :  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामार्फत सातारा जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शशिकांत काटे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्राहकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या व विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले काटे महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे फेडरेशन मर्यादित या संस्थेचे चेअरमन म्हणून ते गेली १५ वर्षे काम पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थांचे फेडरेशन या संस्थेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद (सलग दोन कार्यकाळ) यावर अशासकीय सदस्य म्हणून योगदान देत आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून समाजसेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शाहूपुरी (त्रिशंकू भाग) येथील ग्रामपंचायत स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. पहिल्या निवडणुकीत ते बहुमताने सदस्य म्हणून निवडून आले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोळेश्वरमध्ये तलवार, कोयत्याने मारामारी
पुढील बातमी
कऱ्हाड उत्तरमधील गावांतर्गत कामांसाठी ९६ लाखांचा निधी

संबंधित बातम्या