पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी कुशल साताप्पा कुकडे (रा. आपटेनगर कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दिलीप अरवींद प्रभुणे (रा. शाहूनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या तक्रारीनुसार गेल्यावर्षी दि. 11 फेब्रुवारी
ते 22 ऑक्टोबरदरम्यान सातार्यात शाहूनगरमधील प्रभुणे मॅनेजमेंट कन्सलटन्सी कंपनी नावाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. बांबू प्रोसेसिंग युनीट स्थापन करण्यासाठी संशयिताने तक्रारदारास परदेशातून कर्ज प्रकर करुन देतो, असे सांगितले. तसेच विविध कागदपत्रांची मागणी केली. कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे तयार करुन तक्रारदार कुशल कुकडे यांच्या सह्या घेत त्यांना एक प्रत देत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून कर्ज मंजुरीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. अशाप्रकारे 12 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.