जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली खा. उदयनराजे यांची सदिच्छा भेट

by Team Satara Today | published on : 09 March 2025


सातारा : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे जात खा. उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने पुढील प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. सातारा येथील औद्योगिक वसाहती मध्ये केंद्रीय MSME मंत्रालय च्या माध्यमातुन Technology Centre उभे करणे, क्षेत्र माहुली येथे केंद्रीय विद्यालय उभारणे, सातारा शहरात आर्चरी, climbing wall व स्केटिंग ग्राउंड उभारणे, दिव्यांग बांधवांसाठी sensory गार्डन विकसित करणे, सातारा आणि कराड रेल्वे स्टेशन साठी नियमित बस सेवा सुरू करणे, सातारा येथील पशुसंवर्धन विभागाची जागा MIDC कडे हस्तांतरित करून त्या मध्ये IT पार्क उभी करणे, कृष्णा नदी च्या माथा ते पायथा प्रदूषण मुक्ती साठी ठोस कृती कार्यक्रम तयार करणे, क्षेत्र माहुली येथे मध्यवर्ती कारागृह साठी जागा हस्तांतरण करणे, सातारा, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील ज्या गावांना गावठाण निश्चित झालेले नाही अशा गावांना गावठाण निश्चिती करणे. कोयना, कण्हेर, धोम व उरमोडी धरण परिसरात sea plane कार्यान्वित करणे, जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करणे व अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बारावीची ऑनलाईन बोर्ड परीक्षाही गैरप्रकारमुक्त
पुढील बातमी
महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात

संबंधित बातम्या