सातारा : सातारा शहरातील नवीन एमआयडीसी हद्दीत डीएम गोडाऊन येथे सातारा नगरपरिषद निवडणूक २०२५ची मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने वेणुगोपाल फुड्स ते बाबा फूड्स कंपनी युनिटकडे डीएमओ गोडाऊन समोरून जाणार रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
दिनांक २१ रोजी रात्री १२ वाजल्यापासून वाहतूकीकरता बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीकरता पर्यायी मार्ग- समर्थ हॉस्पिटल येथून कुपर कंपनी जे-२ युनिट जवळून एमआयडीसीमध्ये जाणारी वाहने ही वेणुगोपाल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पर्यंत जातील.
भोर फाटा येथून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बाबा फूड्स कंपनीपर्यंत जातील. या वाहतूक बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे