महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अद्यापही महायुतीत मंथन

मुंबई :  राज्याच्या विधानसभा निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या म्हणजे 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 24 तासातच महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ स्थापन होणेही गरजेचे आहे. महायुतीत भाजपने 132 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण महायुतीसमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून अद्यापही महायुतीत मंथन सुरू आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. तर दुसरीकडे  भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी मैदानात उतरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर आधीच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली आहे. भाजपच्या वर्तुळातही त्यांच्या नावाची चर्चा आहे. पण तरीही मुख्यमंत्रीपदाचं घोड कुठं अडलयं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला  करुन टाकलं आहे. भाजप कार्यकर्त्यांसह फडणवीस यांच्या नावाला महायुतीच्या गोटातून मोठा पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक स्तरातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला   पाठिंबा मिळत आहे. पण तरीही मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्या अडचणी येत आहेत. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून फडणवीसांच्या नावाला पंसती मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे स्वत: संघाचे स्वयंसेवक आहेत. दुसरे म्हणजे फडणवीस हे नागपूरचे असल्याने संघातील सरसंघचालकांपासून अगदी खालच्या स्तरावरील सदस्यांपर्यंत त्यांचा थेट संवाद असतो. तिसरे कारण म्हणजे फडणवीसांनी त्यांच्या राजकीय जीवनातही कायम संघाच्या शिस्तीचं पालन केलं. राजकीय फायदे, नुकसान यांची चिंता न करता त्यांनी संघाचे स्वयंसेवक असल्याची बाब कधीही लपवली नाही.

मागील बातमी
उद्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
पुढील बातमी
निवृत्त होणार नाही, राज्यभर फिरणार

संबंधित बातम्या