लाकडी दांडक्याने एकाला मारहाण

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तसेच दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार येथील यशवंत हॉस्पिटलसमोर दि. 15 रोजी रात्री 7 च्या सुमारास घडला. आदित्य दीपक पोळ (वय 25, रा. सुदर्शन कॉलनी, सैदापूर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, प्रितम अनिल जानकर, त्याचे वडील अनिल जानकर (दोघांचा पत्ता माहिती नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार बोडरे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
पुढील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या