सातारा : अनधिकृतपणे घर कब्जात ठेवल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बाजार सातारा येथील एका डॉक्टर महिलेने देशमुख कॉलनी येथील मिळकत खरेदी केली. मात्र तरीही सुनील दिनकर माने, सिद्धार्थ सुजित माने यांसह दोन महिलांनी संबंधित घराचा ताबा डॉक्टर महिलेला दिला नसल्याने त्यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.