महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी.पाऊस

गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी पाऊस झाला आहे.

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 309.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरीच्या 30.4  टक्के इतका पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा –23.5 (308.8), जावली-मेढा –44.0(561.4),पाटण –66.3(609.1), कराड –20.2 (168.0), कोरेगाव –8.6 (136.1), खटाव–वडूज –6.9(109.5), माण – दहिवडी –6.1 (97.6), फलटण –1.2 (68.3), खंडाळा –6.2 (100.9),वाई -19.3 (230.2), महाबळेश्वर –104.4 (1671.9) या प्रमाणे पाऊस झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा
पुढील बातमी
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज २ तासांचा ब्लॉक

संबंधित बातम्या