सातारा : निर्यात धोरणे, योजना आणि प्रोत्साहनांबद्दल जागरूकता आणि समज वाढवणे गरजेचे असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले.
राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी भागधारकांसोबत एक दिवसीय निर्यात प्रचालन कार्यशाळेचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी कॉलेज, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ उपस्थित होते.
व्यवसाय आणि उद्योग भागधारकांसाठी वर्धित नेटवर्किंग संधी आहे, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, निर्यातदारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात यावी यामुळे प्रदेशातील निर्यात आणि आर्थिक वाढीला चालना मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत व्यवसायांची वाढलेली स्पर्धेला सहज समोर जाता येईल, असेही त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यशाळेत कृष्ण दास नायर डीजीएफल ची भूमिका आणि योजनांची माहिती दिली. प्रणिता चौरे, सुमित साहू निर्यात योजनेची माहिती दिली. तर अनिकेत देवळेकर यांनी निर्यातीबाबत माहिती दिली.
कार्यशाळेस सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, ओद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक उपस्थित होते.