कर्ज थकबाकी प्रकरणात बँकेच्या ताब्यातील सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; दाम्पत्यावर फौजदारी कारवाई

by Team Satara Today | published on : 21 May 2026


सातारा : कर्ज थकबाकी प्रकरणात बँकेच्या ताब्यात घेऊन सील करण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून वास्तव्यास राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार पेठेतील मौली अपार्टमेंटमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेने जप्त केलेले एसएफ-१ व एसएफ-०२ हे फ्लॅट अधिकृतपणे सील केले होते. मात्र संबंधितांनी कुलूप तोडून फ्लॅटचा ताबा घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अभय सोनकुवर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सचिन गाडे व भाग्यश्री गाडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हरळी येथे जमिनीच्या वादातून स्वतःच्या भावासह वृद्ध आई-वडिलांना मारहाण
पुढील बातमी
ज्यांना यायचे असेल त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येण्याची तयारी असेल तरच यावे - शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या